हत्तीणी माधुरीने सार्वजनिक ठिकाणी एका माणसावर हल्ला केल्याचा धक्कादायक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, जेव्हा मठाद्वारे तिला अभयारण्यातून (म्हणजे तिच्या नवीन घरातून) पळवून नेण्यासाठी आणि मिरवणुकीत तिची परेड काढण्यासाठी मोहीम राबविली जात आहे.
जैन मठ – स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ (करवीर) ने जामनगर येथील वनताराच्या राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्ट (RKTEWT) पुनर्वसन सुविधेकडे हत्तीणी माधुरीला [जिला महादेवी म्हणूनही ओळखले जाते] नांदणी गावातील मिरवणुकीत एक महिना परेड करण्यासाठी परत बोलावण्याची परवानगी मागितली होती. PETA इंडियाने सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या उच्चाधिकार समिती (HPC) आणि महाराष्ट्राच्या मुख्य वन्यजीव रक्षकांसमोर नवीन व्हिडिओ पुरावे सादर केले आहेत. ज्यामध्ये १३ मे २०२२ रोजी एका गावात धार्मिक मिरवणुकी दरम्यान हत्तीणी माधुरीने अचानक एका माणसावर हल्ला करताना दिसत आहे. ही घटना तेव्हा घडली, जेव्हा लोक तिच्या पाठीवर स्वार होते आणि फुटेजमध्ये तिला चाकूने मारहाण केल्याचेही स्पष्ट दिसून येते आहे. HPC चे हत्ती तज्ञ आणि इतर पशुवैद्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, माधुरीला गंभीर संधिवात आणि इतर वेदनादायक आजार तसेच आरोग्यविषयक समस्या असूनही, मठाची अशी अवास्तव मागणी आहे.
View this post on Instagram
आयुष्याची ३३ वर्षे एकाकी आणि साखळदंडात घालवल्यानंतर, ३६ वर्षीय हत्तीणी माधुरी ३० जुलै २०२५ रोजी जामनगरमधील वनतारा येथील आरकेटीईडब्ल्यूटी येथे नवीन जीवन जगण्यासाठी आली. २८ जुलै २०२५ रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने माधुरीच्या बिघडते आरोग्य आणि मानसिक त्रास लक्षात घेता, तिला दिलासा देण्याचा माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. तरीही, न्यायालयाच्या आदेशानुसार जैन मठाने माधुरीला शांतपणे सोडण्यास नकार दिला आणि स्थानिकांद्वारे पोलिस, PETAइंडिया आणि आरकेटीईडब्ल्यूटी कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. परिणामतः कारच्या खिडक्या फुटल्या, लोक जखमा झाले आणि PETAइंडियाच्या एका कर्मचाऱ्यांच्या बरगडीला गंभीर दुखापत झाली.
मठामध्ये सतत काँक्रीटवर उभी राहिल्यामुळे पायांच्या अनेक वेदनादायक आजारांनी त्रस्त असणाऱ्या माधुरीला गर्दी आणि गोंगाट असलेल्या मिरवणुकांमधून फिरवले जायचे आणि अंकुश (आकड्यातील लोखंडी रॉड) सारख्या शस्त्रांनी तिला नियंत्रित करण्यात यायचे.
हत्ती वर्षानुवर्षे एकाकीपणा आणि बंदिवासात असलेल्या शारीरिक आणि मानसिक यातनांमुळे हिंसक होतात.
माधुरीने माणसांवर हल्ला करून वारंवार आपली निराशा व्यक्त केली आहे, २०१७ मध्ये मठाच्या मुख्य पुजाऱ्याला भिंतीवर परत परत आपटून तिने मारले आहे.
या परिस्थितीत माधुरीला मानसिक त्रास होत असल्याचे ओळखून, भट्टारक मठाने सुरुवातीला तिचे पुनर्वसन करण्याचा विचार केला होता. पण, मोहरम आणि इतर कार्यक्रमांसाठी तिला भाड्याने देण्यास सुरुवात केल्याने त्यांनी त्यांची भूमिका बदलली.
एचपीसीने नियुक्त केलेल्या उपसमितीसह तज्ञांनी सातत्याने नोंदवलेल्या माधुरीच्या वैद्यकीय अहवालात असे नोंदवले की, काँक्रीटवर गेल्या अनेक दशकांपासून बांधल्यामुळे तिला अनेक दीर्घकालीन आजार आणि त्रास आहेत, ज्यात आता कधीही बरे न होणारे आजारांचा समावेश आहे. ज्यात: स्टेज 4 चा संधिवात; पाय कुजणे, एक वेदनादायक आणि क्षीण करून टाकणारी स्थिती ज्यासाठी सतत आणि विशेष काळजीची आवश्यकता आहे; जास्त वाढलेले नखे आणि फुटलेले पाय यांचा समावेश आहे. आरकेटीईडब्ल्यूटी मधील तज्ञ पशुवैद्यांनी सार्वजनिक डोमेनमध्ये सामायिक केलेले तपशीलवार निरीक्षण वरील निष्कर्षांची खात्री करते आणि पायाच्या नखांवर जखमा आणि फोड, तिच्या पुढच्या पायांवर जुनाट जाळल्यासारख्या जखमा, तिच्या पायांच्या लहान हाडांमध्ये अनेक फ्रॅक्चर आणि मठातील तिच्या आयुष्यातील गंभीर रूढीवादी वर्तन दर्शविते. माधुरीचे सतत डोलणे आणि डोके हलवणे, एकांतवासात घालवलेल्या दशकांचा परिणाम आहे. तिच्या स्वतःच्या प्रजातींशी सामाजिक संवादापासून दूर राहिल्यामुळे तिच्या वर्तनात मानसिक त्रासाची चिन्हे दिसतात.
आरकेटीईडब्ल्यूटी मध्ये, मठात वर्षानुवर्षे एकटे राहिल्यानंतर माधुरी दुसऱ्या वाचवलेल्या हत्तीशी भावनिकरित्या जोडली गेली आहे. असे असूनही मठाने तिला मिरवणुकीसाठी परत पाठवण्याची मागणी केली आहे, म्हणजेच तिला शारीरिक आणि भावनिक त्रास देणे त्यांना कायम सुरु ठेवायचे आहे.
PETA इंडिया आणि फेडरेशन ऑफ इंडियन अॅनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन (FIAPO) यांनी जैन मठाला मंदिरातील विधींमध्ये वापरण्यासाठी एक यांत्रिक हत्ती दान केला आहे. सर्व मंदिरांना प्राणी कल्याण आणि मानवी कल्याणासाठी जिवंत हत्तींऐवजी मानवनिर्मित यांत्रिक हत्ती निवडण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. अलिकडेच, कर्नाटकातील हजार खांबी जैन मंदिर हे PETA इंडियाच्या मदतीने या तंत्रज्ञानाचे स्वागत करणारे जगातील पहिले जैन मंदिर बनले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या कॅबिनेट वनमंत्र्यांना माधुरीला अभयारण्यातच ठेवून, तिचे संरक्षण करण्याची विनंती करण्यासाठी तसेच, मठाला मिरवणुकीसाठी यांत्रिक हत्ती स्वीकारण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आमच्यात सामील व्हा.
माधुरीला शांततेत निवृत्त होऊ देण्यासाठी अधिकाऱ्यांना ट्विट करा
